Private Advt

खंडाळ्यातील विवाहिता आत्महत्या प्रकरण : अटकेतील आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

भुसावळ :  तालुक्यातील खंडाळा येथील विवाहितेने सासरच्या जाच्याला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली होती. ही घटना सोमवार, 3 जानेवारी रात्री 9 वाजेपूर्वी उघडकीस आली होती. या प्रकरणी आठ जणांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर पतीसह, दीराणी व सासु-सासर्‍यांना अटक करण्यात आली होती. सुरूवातीला आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली तर कोठडी संपल्यानंतर शुक्रवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

चौघांना अटक, चौघे पसार
खंडाळा येथील सुनीता विजय पाटील (33) या विवाहितेने सोमवारी रात्री गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणी मयताच्या भावाने फिर्याद दिल्यानंतर आठ संशयीतांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी पतीसह दीराणी, सासु व सासरे यांना अटक केली अन्य चौघे आरोपी पसार झाले आहेत. सहाय्यक पोलिस प्रकाश वानखेडे अधिक तपास करीत आहेत.