खंडव्यात 5 रोजी ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक ; चार रेल्वे गाड्या रद्द

0

प्रवाशांची होणार गैरसोय ; अप-डाऊन कटनी पॅसेंजरसह खंडवा-वीर गाडीचा समावेश

भुसावळ- खंडवा रेल्वे स्थानकावर स्टील प्लेट गर्डर टाकण्यासाठी 5 डिसेंबर रोजी विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असून या दिवशी धावणार्‍या चार पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत शिवाय तीन गाड्या उशिराने धावणार असल्याने रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. दरम्यान, सकाळी 10.35 ते दुपारी 4.25 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.

या रेल्वे गाड्या झाल्या रद्द
5 रोजी 51187 डाउन भुसावल-कटनी पॅसेंजर, अप 51188 कटनी-भुसावल पॅसेंजर रद्द करण्यात आली असून त्यासोबतच अप 51686 व डाऊन 51685 डाऊन खंडवा-बीर दरम्यान धावणारी पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. शिवाय 11067 लोकमान्य तिलक टर्मिनस-फैजाबाद साकेत एक्सप्रेस दुपारी दोन ते 4.25 वाजेपर्यंत सव्वादोन तास बगमार रेल्वे स्थानकावर थांबवण्यात येणार असून 12779 वास्को-निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस दुपारी 2.35 ते 4.25 दरम्यान एक तास 50 मिनिटे डोंगरगाव स्थानकावर थांबवण्यात येणार आहे तसेच 15017 लोकमान्य तिलक टर्मिनस-गोरखपुर काशी एक्सप्रेस 3.35 ते 4.25 पर्यंत 50 मिनिटे मांडवा स्थानकावर थांबवण्यात येणार आहे. रेल्वे प्रवाशांनी होणार्‍या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.