Private Advt

खंडव्यातील आरोपी भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात

गुन्हेगारांच्या शोधासाठी धडक मोहिम : तिघांवर प्रतिबंधात्मक

भुसावळ : लोहमार्ग पोलिसांनी 12 स्टॅण्डींग वॉरंट असलेल्या आरोपींच्या शोधासाठी 12 ते 13 दरम्यान ऑल आऊट मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेसाठी दोन अधिकार्‍यांसह 20 अंमलदारांची नेमणूक करण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान खंडवा येथील सहा, बर्‍हाणपूर येथील एक तर भुसावळातील दोन व जळगावातील तीन संशयीतांचा शोध घेण्यात आला. अस्लम खान हबीब खान (63, खंडवा मध्यप्रदेश) या वॉण्टेड आरोपीला अटक करण्यात आली तर अन्य तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. दरम्यान चौघे संशयीत मयत झाल्याची व पाच संशयीत पत्त्यावर राहत नसल्याचे निदर्शनास आले. रेकॉर्डवरील 10 आरोपी तपासले असता त्यातील तिघे घरी आढळले नाहीत तर संशयीत सोनू अवसरमल (30, भारत नगर, भुसावळ) हा कारागृहात असल्याची माहिती मिळाली तर संशयीत अमोल रवींद्र भोवते (38, द्वारका नगर, भुसावळ), हसन अली नियाजली इराणी उर्फ असु (20, पापानगर, भुसावळ), अल्ताफ शहा सिरातशहा फकीर (23, पाचोरा) यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई औरंगाबाद लोहमार्गच्या पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, पोलिस उपअधीक्षक दीपक काजवे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ लोहमार्गचे पोलिस निरीक्षक विजय घेरडे, सहा.निरीक्षक भाऊसाहेब मगरे, एएसआय सुनील इंगळे, भरत शिरसाठ, अनिंद्र नगराळे, राजेश पुराणिक, राजेश पवार, पोलिस हवालदार अनिल खोडके, पांडुरंग वसु, जगदीश ठाकुर, धनराज लुले, दिवाणसिंग राजपुत, अजित तडवी, सागर खंडारे, प्रदीप शेजवळकर, गोपाळकृष्ण सोनवणे, राजेश पाटील, शिपाई ज्योती शाहु आदींच्या पथकाने केली.