खंडणी प्रकरणातील एकाचा अटकपूर्व फेटाळला

0

जळगाव ।  प्लॉट खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून कानळदा येथील तरुणाचे अपहरण करून त्याला पैशांसाठी मारहाण केल्याप्रकरणी डिसेंबर महिन्यात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील एका संशयिताने अतिरीक्तसत्र न्यायाधीश अटकपूर्व जामिनासाठी दाखल केलेला अर्ज शनिवारी फेटाळला आहे.

कानळदा येथील नीलेश विष्णू भंगाळे याचे प्लॉट खरेदी- विक्रीच्या व्यवहारातून 11 डिसेंबर रोजी अपहरण केले होते. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या प्रकरणातील फरार असलेल्या हरीश बाळू सपकाळे (रा. जाकीर हुसेन कॉलनी) याने अटकपुर्व जामिनासाठी न्यायाधीश दरेकर यांच्या न्यायालयात दाखल केलेला अर्ज शनिवारी फेटाळला आहे.