क्षत्रिय महाराणा प्रताप राजपूत समाज मंडळातर्फे गरजूंना धान्य, किराणाचे वाटप

0

नवापूर। देशात, राज्यात कोरोना साथीच्या रोगाने भयंकर थैमान मांडले आहे. या पाश्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी प्रशासनाने लागू केले आहे. या लाँकडाऊनच्या काळात मोलमजुरी करून, धुणी भांडे करून आपले उदरनिर्वाह करणाऱ्या परिवारांवर अक्षरक्ष उपासमारीसारखी परिस्थिती उद्भवली आहे. ही बाब समाजातील युवकांच्या निदर्शनास आली. त्यांनी शहरातील समाजातील गरीब व गरजू असे ३० घरांचा शोध घेतला. सर्व ३० समाजबांधवांना गृहोपयोगी किराणा माल सामानाची किट वाटप करण्यात आली. तसेच ज्या ज्या समाजबांधवांना मदत करण्यात आली. या उपक्रमाचे सर्वांनी स्वागत केले आहे.

Copy