Private Advt

क्रेडीटकार्ड धारकाची 15 हजारात ऑनलाईन फसवणूक

अमळनेर : खाजगी व्यवसाय करणार्‍या तरुणाला क्रेडीट कार्डची मर्यादा वाढवून देण्याच्या नावाखाली ओटीपी विचारून 15 हजाराची ऑनलाईन गंडा घालण्यात आला. अमळनेर पोलिसात या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

ओटीपी विचारताच झाली फसवणूक
अमळनेर शहरातील इस्लामपूरा भागातील शेख मोहम्मद जुनेद (29) हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खाजगी व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवार, 19 एप्रिल रोजी सायंकाळी त्याला 08881029192 क्रमांकावरून कॉल आला. समोरील व्यक्ती रोहित सिंग बोलत असल्याची बतावणी करून आपण आयसीआयसीआय बँकेतील कर्मचारी असल्याचे सांगितले. तुमचे क्रेडीट कार्डचे 90 हजारांहून एक लाख 65 हजारांची लिमीट वाढविण्याचे असल्याचे कंपनीने ठरविले आहे. असे सांगून तुम्हाला आलेला ओटीपी गोड बोलून विचारून घेतला. काही कळण्याच्या आत त्यांच्या क्रेडीट कार्डच्या माधमातून पाच हजारांचे तीन व्यवहार करण्यात येवून 15 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेख मोहमंद यांनी तातडीने अमळनेर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तपास पोलिस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहे.