क्रीडा स्पर्धेत चंद्रपूर, पोफळी, परळी संघ विजयी

0

भुसावळ : महानिर्मिती आंतर विद्युत बाह्यगृह क्रीडा स्पर्धा गेल्या तीन दिवसापासून दीपनगर येथे सुरु होत्या. या स्पर्धेत क्रिकेटमध्ये चंद्रपूर, संघाने विजय मिळविला. तर उपविजेते परळी संघ ठरला. कबड्डीमध्ये पोफळी संघाने विजय मिळवला तर नाशिक संघ उपविजेता ठरला. व्हॉलीबॉलमध्ये परळी संघाने विजय मिळवला. तर चंद्रपूर संघ उपविजेता ठरला. तीन दिवसीय या क्रिडा स्पर्धेत चंद्रपूर, कोराडी, खापरखेडा, नाशिक, भुसावळ, पारस, परळी, पोफळी, मुंबई आणि उरण या वीज निर्मिती केंद्रातील संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत 450 खेळाडूने सहभाग नोंदविला.

बक्षिस समारंभात मान्यवरांची होती उपस्थिती
दीपशक्ती क्रिडा संकुलात स्पर्धेचे समारोप संपन्न झाले. यावेळी महानिर्मितीचे कार्यकारी संचालक सतीश चौरे अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यकारी संचालक राजू बुरडे तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.जालींदर सुपेकर, मुख्य अभियंता अभय हरणे, उपमुख्य अभियंता माधव कोठुळे, नितीन गर्गे, मोहन आव्हाड, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अनिल मुसळे, अधीक्षक अभियंते व्ही.एम.बारंगे, एम.बी.पेठकर, सी.एम.निमजे, पी.पी.देशकर, एन.आर.देशमुख, राजेश राजगडकर, एब.बी.अहिरकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजयी संघांना बक्षीस वितरण करण्यात आले.