Private Advt

क्रीडा साहित्य मागणीसाठी नेहरू युवा केंद्रातर्फे युवक मंडळांना आवाहन

जळगाव, दि.२० – केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे युवक मंडळांना मोफत क्रीडा साहित्य वितरण करण्यात येणार आहे. नेहरू युवा केंद्राशी संलग्नित असलेल्या जिल्ह्यातील युवक मंडळांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

नेहरू युवा केंद्रातर्फे दरवर्षी जिल्ह्यातील युवक मंडळांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात येत असते. यावर्षीचे क्रीडा साहित्य लवकरच वाटप करण्यात येणार असून नेहरू युवा केंद्राशी संलग्नित असलेल्या युवक मंडळांना नोंदणीसाठी आवाहन करण्यात येत आहे. ज्या संस्था, युवक मंडळांना क्रीडा साहित्य हवे आहे त्यांनी नेहरू युवा केंद्र कार्यालय, द्रौपदी नगर, मानराज पार्कजवळ, जळगाव या कार्यालयात किंवा 0257 2951754 या फोन क्रमांकावर दिनांक 5 फेब्रुवारीपर्यंत संपर्क करावा, असे आवाहन नेहरू युवा केंद्र जळगावचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी केले आहे.