क्रीडा शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिरास सुरुवात

0

जळगाव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील क्रीडा शिक्षकांचे जिल्हास्तरीय क्रीडत्त शिबिरास जिल्हा क्रीडा संकुलात उत्साहात सुरुवात झाली.

दि. 12 ते 21 डिसेंबर 2016 या दरम्यान होणार्‍या या 10 दिवसीय निवासी शिबीराचे उद्घाटन शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांचेहस्ते झाले. याप्रसंगी नगरसेवक नितीन बरडे, राजेश जाधव, डॉ.प्रदीप तळवेलकर, फारुख शेख, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, क्रीडा अधिकारी रेखा पाटील, निशा गायकवाड, अनिल चांदुरकर, एम.के.पाटील, क्रीडा मार्गदर्शक गुरुदत्त चव्हाण, अरविंद खांडेकर यांची उपस्थिती होती.

या शिबीरात राज्य मास्टर ट्रेनर अजय देशमुख, प्रशांत कोल्हे, रणजित सुनिल वाघ, देविदास महाजन, जयांशु पोळ, मनोज परदेशी, सुनिल शिरसाठ, राहुल साळुंखे, योगेश साळुंखे हे प्रशिक्षण देत असुन शिबीर समन्वयक म्हणून राजेश जाधव, प्रशांत जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या शिबीरात कबड्डी, खो-खो, अ‍ॅथलेटिक्स, व्हॉलीबॉल, कुस्ती, फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, आर्चरी, तायक्वांदो, जिन्मॅस्टीक या खेळाचा समावेश असुन या बरोबरच खेळ मानसशास्त्र स्पोर्ट मेडीसीन, सर्कीट ट्रेनिंग, वेट ट्रेनिंग, उत्तेजिन व्यायाम प्रकार, शिथीलीकरण, डोपींग, मैदाने व साहित्याची निगा, आहारशास्त्र, क्रीडा दुखापती, प्रथमोपचार, योगासने या बाबींचा समावेश आहे. सकाळ व सायंकाळ अशा दोन सत्रात होणार्‍या या शिबीरात सकाळी 6.30 ते 9 या वेळेत योगासने, व्यायाम व खेळ तर दुपारी 11 ते 2 या वेळेत विविध विषयात तर व्यक्तींचे मार्गदर्शन सत्र तर दुपारी 4 ते 7 या वेळात मैदान व खेळ यावर मार्गदर्शन करण्यात येत आहे. शिबीरार्थींची निवास व भोजन व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आली आहे. शिबीराच्या यशस्वी आयोजनासाठी संजय महिरे, गोविंद सोनवणे, विनोद माने, विनोद कुलकर्णी, उमेश मराठे हे परिश्रम घेत आहेत.