कौशल्य विकास विभागातर्फे व्हीटीपी मेळावा

0

जळगाव : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विभागातर्फे विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य विकसित होऊन त्यांना रोजगार किंवा स्वयंरोजगार उपलब्ध व्हावे, यासाठी प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना अर्थात (पीएमकेव्हीवाय, एनयूएलएम) व इतर योजना राबविण्यात येत आहेत. या योजनेचा प्रसार व प्रचार व्हावा, ज्याच्यामाध्यमातून व्हीटीपी योजना राबविण्यात येत आहे त्यांच्याशी प्रशासकीय अधिकार्र्‍याची चर्चा व्हावी यासाठी 20 डिसेंबर रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध कलाविष्काराचे सादरीकरण होणार
सदर मेळावा जळगांव शहरातील सदगुरू एज्युकेशन सोसायटीचे बीपीएड कॉलेजचा हॉल, ख्वॉजामिया दर्ग्याजवळ होणार आहे. मेळाव्यात कौशल्य विकास योजनेत प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलेे. मेळाव्यात विद्यार्थ्यांना मुद्राबँक , कौशल्य विकास योजना, आणि इतर शासकीय योजनांचीही माहिती देण्यात येणार आहे. मेळाव्याच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल, कौशल्य विकास व उद्योजकता सहाय्यक संचालक प्रभाकर खर्डे, जिल्हा माहिती अधिकारी मिलीं दुसाणे, मुद्रा बँकेचे अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मेळावा कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये असलेले विविध कलाविष्काराचे सादरीकरण होणार आहे.