कौशल्य विकास रोजगार मेळाव्यास प्रतिसाद

0

यावल । सहाय्यक संचालक, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जळगाव कार्यालयामार्फत रोजगार मेळावा घेण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी यशवंत सपकाळे यांनी उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन केले. या मेळाव्यास नवकिसान फर्टिलायझरचे अधिकारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी एस.बी. पाटील, एस.व्ही. अहिरे, वरिष्ठ लिपीक दत्ता रिठे यांनी काम पाहिले.

यांची होती उपस्थिती
या मेळाव्यात रावेर येथील महालक्ष्मी बहुउद्देशीय संस्था, पुणे व मुंबई येथील आयटी कंपनीत सुरक्षा रक्षक भरती, धुत ट्रान्समिशन पुणे, नवकिसान टेक्नॉलॉजी जळगाव, नवभारत फर्टिलायझर्स औरंगाबाद या कंपन्यांचे प्रतिनिधी हजर होते.