कौशल्य विकास आणि उद्योजकता निर्माण करण्याची आवश्यकता

0

भुसावळ । सध्याच्या तांत्रिक संस्थांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना कौशल्याचे धडे देणे त्यांचा दर्जा उंचावावा, कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठीचे ‘कौशल्य विकास आणि उद्योजकता’ निर्माण करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश्य आहे असे प्रतिपादन प्रा. निलेश निर्मल यांनी केले. प्रा. निलेश निर्मल यांनी आयआयटी खरगपुर येथे कार्यशाळा प्रमुखांच्या कार्यशाळेत भाग
घेतला होता.

आयआयटी खरगपुर यांचे सहकार्य
भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या नॅशनल मिशन ऑन एजुकेशन थ्रू इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आयआयटी, खरगपुर व गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड टेलीकम्यूनिकेशन इंजीनियरिंग विभागाच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सिमोस, मिक्सेड सिग्नल अ‍ॅन्ड रेडिओ फ्रीक्वेंसी व्हीलएसआय डिजाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जे.टी. महाजन अभियांत्रिकी, गोदावरी अभियांत्रिकी, शासकीय तंत्रनिकेतन जळगाव व गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या 26 प्राध्यापकांनी यामध्ये सहभाग घेतला.

कौशल्यप्राप्त नविन विद्यार्थ्यांमुळेच प्रगती
भविष्यातल्या आपल्या जगण्याची दिशाच बदलून टाकण्याचं सामर्थ्य असलेल्या अशाच नव्या तंत्रज्ञानांपैकी काही मोजक्या परंतु क्रांतिकारी ठरू शकणार्‍या तंत्रज्ञान पर्यायांचा अभ्यास यशस्वीपणे या कार्यशाळेत करण्यात आला आहे व त्याचा सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांना नक्कीच फायदा होणार आहे असा विश्वास प्राचार्यांनी दाखवला. 170 वर्षाच्या प्रवासानंतर ‘टेलिग्राम’ या संदेशवहन तंत्रज्ञानानं निरोप घेतला. त्या जागी ईमेल, मोबाइल, एसएमएस आणि फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्ट्राग्राम, हाइक असे अनेक सोशल मीडिया पर्याय उपलब्ध होऊन आपण ते वापरण्यास सरावलो देखील. भारतातील इलेक्ट्रॉनिक्स व त्या सोबतच टेलिकॉम क्षेत्राने दैदीप्यमान प्रगती साध्य केली आहे ती फक्त आपल्या देशामध्ये असलेल्या कौशल्यप्राप्त नविन विद्यार्थ्यांमुळेच असे प्रतिपादन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड टेलीकम्यूनिकेशन इंजीनियरिंगचे विभाग प्रमुख डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले.

तंत्रज्ञानात दिवसेंदिवस बदल
सध्याच्या काळात ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’ याकडे असलेला प्राध्यापक, पालक व विद्यार्थ्यांचा कल या विषयावर ही कार्यशाळा आयोजित केली होती. आज अत्याधुनिक असलेल्या तंत्रज्ञानाची जागा नव्याने उदयास आलेले तंत्रज्ञान घेतं आणि काही कळायच्या आत पहिलं मागं पडतं चालतय असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.
आर.पी.सिंह यांनी मांडले.