Private Advt

कौटुंबिक छळ असह्य : सुनेनेच सासुची दगडाने ठेचून हत्या

धुळे : कौटुंबिक छळ असह्य झाल्याने सुनेनेच सासुची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना शिंदखेडा तालुक्यातील बेटावद शिवारात शनिवारी सायंकाळी उशिरा घडली. या घटनेत सियादीबाई लाला बारेला (45) यांची हत्या करण्यात आली तर संशयीत आरोपी भुरीबाई गणे बारेला (18) या सुनेला नरडाणा पोलिसांनी अटक करीत तिच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.

कौटुंबिक वादानंतर सुनेने केली सासुची हत्या
गणेश बारेला हा शिरपूर तालुक्यातील वरझडी, पारशीपाडा येथील रहिवासी असून गेल्या दोन महिन्यांपासून तो बेटावद येथील यशवंत निंबा महाजन यांच्या शेतात सालदार म्हणून वास्तव्याला आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नी भुरीबाई बारेला आणि आई सियादीबाई बारेला वास्तव्यास होत्या. सासु-सुनांमध्ये नेहमीच वाद होत असताना शनिवारी सायंकाळच्या सुमारास दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन भांडण झाले मात्र हे भांडण विकोपाला गेले.रागाच्या भरात भुराबाईने तिची सासू सियादाबाई यांच्या डोक्यात मागून लाकडी दांड्याने जोरदार वार केला. त्यानंतर जवळच असलेल्या एका लिंबाच्या झाडाखाली नेले आणि त्याठिकाणी दगडाने ठेचले. या घटनेत सियादीबाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे माहित झाल्यावर लगेच त्यांच्या मुलाने घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला सियादीबाई यांना बेटावद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले मात्र प्रकृती अत्यवस्थ असल्याने तातडीने धुळे येथे हलवण्याचे सांगितल्यानंतर धुळे येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

आधी केला सासुच्या हत्येचा बनाव
गणेश बारेला हा शेतात आल्यावर त्याला आपल्या पत्नीचे हात रक्ताने माखलेले दिसले. आरोपीने सुनेने आपल्या पतीला सासुची दोघा जणांनी निंबाच्या झाडाखाली नेऊन मारहाण करीत हत्या केल्याची माहिती दिली होती पोलिसांनी कसून चौकशी केली असता सून असलेली भुरी बरेला हीच सासूची मारेकरी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. या प्रकरणी गणेश पावरा याच्या तक्रारीवरून त्याची पत्नी भुरीबाई पावरा हिच्या विरोधात नरडाणा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.