कोहली ऑस्ट्रेलियन कसोटी संघाच्या कर्णधारपदी !

0

मेलबर्न : आयसीसीच्या कसोटी संघात विराट कोहलीला स्थान मिळालेले नाही मात्र कोहलीला ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या आपल्या सर्वोत्तम कसोटी संघात स्थान दिले असून त्याला संघाचे नेतृत्त्वपद देखील दिले आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या आपल्या सर्वोत्तम संघात विराट कोहलीची थेट कर्णधार म्हणून निवड केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संकेतस्थळावर सर्वोत्तम कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाने स्टीव्हन स्मिथ याला संघात स्थान दिले असले तरी डेव्हिड वॉर्नरचा मात्र समावेश करण्यात आलेला नाही.

अश्विनचा देखील समावेश
विराट कोहलीसह भारताच्या अष्टपैलू आर.अश्विनचा देखील संघात समावेश आहे. आयसीसीने जाहीर केलेला सर्वोत्तम कसोटी आणि एकदिवसीय संघ हा खेळाडूंनी १४ सप्टेंबर २०१५ ते २० सप्टेंबर २०१६ पर्यंतच्या कालावधीत केलेल्या कामगिरीच्या आधारावर जाहीर करण्यात आला आहे, तर ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने यंदाच्या वर्षात जानेवारी ते डिसेंबरमध्ये केलेल्या कामगिरीच्या आधारावर खेळाडूंची निवड केली आहे. संघात कोहली (भारत, कर्णधार), अझर अली (पाकिस्तान), जो रुट (इंग्लंड), स्टीव्हन स्मिथ (ऑस्ट्रेलिया), बेन स्टोक्स (इंग्लंड), जॉनी बेअरस्टो (इंग्लंड), क्विंटन डी कॉक (द.आफ्रिका), आर.अश्विन (भारत), रंगना हेराथ (श्रीलंका), मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया), रबाडा (द.आफ्रिका) यांचा समावेश आहे.