कोहलीला यंदाचा सर्वोत्तम कसोटी कर्णधाराचा पुरस्कार

0

नवी दिल्ली: भारतीय संघाचा कप्तान विराट कोहली ईएसपीएन-क्रिकइन्फो वार्षिक पुरस्कारांमध्ये १० व्या वार्षिक अॅवॉर्ड सोहळ्यात ‘कॅप्टन ऑफ द इयर’ म्हणून निवडला गेला आहे. गेल्या वर्षात १२ पैकी ९ कसोटीत विजय मिळवून त्याने ही कामगिरी साधली आहे. बेस्ट बॅटिग परफॉर्मन्स ऑफ द इयर साठी इंग्लंडचा बेन स्टोकची निवड झाली आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध १९८ बॉल्समध्ये ठोकलेल्या २५८ रन्स त्याला हा गौरव मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत. बेस्ट बॉलर ऑफ द इयरसाठी सलग दुसऱ्यांदा इंग्लंडचाच स्टुअर्ट ब्रॉड याची निवड केली गेली. त्याने तिसऱ्या कसोटीत १७ पैकी ६ विकेट काढून दक्षिण आफ्रिकेविरोधातली सिरीज जिंकण्यात महत्त्वाचे योगदान दिले.

कार्लोस ब्रेथवेटने सर्वोत्तम ट्वेन्टी-२० फलंदाज
दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७८ धावांची खेळी साकारली. त्याची सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज या पुरस्कारासाठी निवड झाली आहे, तर वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज सुनील नरिन सर्वोत्तम एकदिवसीय गोलंदाज ठरला आहे. विंडीजच्या कार्लोस ब्रेथवेटने सर्वोत्तम ट्वेन्टी-२० फलंदाजाचे आणि बांगलादेशच्या मुस्ताफिझूर रेहमानने सर्वोत्तम ट्वेन्टी-२० गोलंदाजाच्या पुरस्कारावर दावा केला आहे. यावेळी महिला क्रिकेटसाठीही तीन आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये अॅवॉर्ड देण्यात आली. त्यात वेस्ट इंडिजची हेले विलियम्सला बॅटींगसाठी, ले कॅस्परेक या न्यूझीलंडच्या ऑफस्पीनरला बॉलींगसाठी अॅवॉर्ड जाहीर झाली. या अॅवार्डसाठी विजेत्यांची निवड करण्यासाठी स्वतंत्र ज्युरी समिती नेमली गेली होती. त्यात ईएसपीएन क्रिसीन्फोचे वरीष्ठ संपादक, लेखक, ग्लोबल कॉरस्पाँडंट, क्रिकेटपटू इयान चॅनल, माहेला जयवर्धने, रमीज राजा, इशा गुप्ता, संबित बाल, कर्टनी वॉल्श, मार्क बुचर, सायमन टॉफेल याचा समावेश होता.