कोषागार कार्यालयाची ऑनलाईन प्रणाली बंद राहणार

0

नंदुरबार। वित्त विभागाच्या शासन परिपत्रकानुसार आदेशित केल्याप्रमाणे नंदुरबार जिल्हयातील कोषागार व उपकोषागाराशी संबंधित ऑनलाईन प्रणाली जसे सेवार्थ, बिम्स, बिलपोर्टल, ग्रास, निवृत्तीवेतनवाहिनी, कोषवाहिनी, वेतनिका व अर्थवाहिनी आदी सर्व प्रणाली अद्ययावत करण्यासाठी 06 मे रोजी सायंकाळी 6.00 पासून 11 मे रोजी सकाळी 11.00 बंद राहणार आहे, असे जिल्हा कोषागार अधिकारी ग. रा. पाटील यांनी कळविले आहे.

ग्रास प्रणाली 12 मे रोजी 6.00 पासुन ते 14 मे रोजी 6.00 पर्यंत बंद राहणार असल्याने त्यापूर्वीच जिल्हयातील सर्व मुद्रांक विक्रेत्यांनी मुद्राकांचा अतिरिक्त साठा कोषागार/ उपकोषागारातुन प्राप्त करुन घ्यावा. 6 ते 11 मे पर्यंत निवृत्तीवेतनवाहिनी बंद असल्याने निवृत्तीवेतन धारकांनी निवृत्तीवेतन विषयक कामांसाठी 11 मे नंतर कोषागार कार्यालयात संपर्क साधावा. सर्व आहरण व संवितरण अधिकारी, मुद्रांक विक्रेते, निवृत्तीवेतनधारकांनी याची नोंद घ्यावी, असेही कळविण्यात आले आहे.