Private Advt

कोवॅक्सिन डेल्टा प्लस व्हेरिएंटविरोधात प्रभावी

नवी दिल्ली : देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यातच डेल्टा प्लस व्हेरिएंट धोकादायक ठरू लागला आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनादेखील डेल्टा व्हेरिएंटची लागण होत असल्याचं समोर आलं आहे. या परिस्थितीत कोवॅक्सिन लसीबद्दल महत्त्वाची माहिती आहे. कोवॅक्सिन डेल्टा प्लस व्हेरिएंटविरोधात प्रभावी असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) संशोधनातून समोर आली आहे.

भारत बायोटेकनं तयार केलेली कोवॅक्सिन लस लक्षणं असलेल्या कोविड-१९ विरोधात ७७.८ टक्के, तर डेल्टा व्हेरिएंटविरोधात ६५.२ टक्के असल्याचं प्रभावी असल्याची माहिती याआधीच समोर आली आहे. यानंतर आता कोवॅक्सिन डेल्टा प्लस व्हेरिएंटविरोधातही प्रभावी असल्याचं आयसीएमआरचा अहवाल सांगतो. त्यामुळे मेक इन इंडिया कोवॅक्सिनला मोठा दिलासा मिळाला आहे.