कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कारवाई

ग्रामपंचायतिने लवला ५ दुकानांना प्रत्येकी ५ हजारांचा दंड

शिरपूर – तालुक्यात कोरोनामुळे जनता कर्फ्यु सुरू असतांना वाडी येथे कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५ किराणा दुकानांवर वाडी ग्रामपंचायत कडून दंडात्मक कार्यवाही करण्यात आली.
       तालुक्यात कोरोना व्हायरस मुळे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने शहरासह तालुक्यात प्रशासनाने जनता कर्फ्यु जाहीर केला होता .तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने तालुक्यातील वाडी येथे सूचना देऊन ही बालाजी किराणा ,चंद्रेश किराणा,आर के किराणा,वैष्णवी इलेक्ट्रॉनिक व जगन पाटील हे नियमाचे उल्लंघन करतांना २९ मार्च रोजी सकाळी मंडळ अधिकारी व स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांना आढळून आले.त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन करीत कोरोनाचा प्रसारास कारणीभूत ठरल्याप्रकरणी या ५ दुकानांवर प्रत्येकी ५ हजाराचा दंड आकारून ग्रामपंचायत कडून कार्यवाही करण्यात आली.सदर कार्यवाही मंडळ अधिकारी अशोक गुजर,जितेंद्र पाटील, भरत दशरथ भिल,केवल सिंग राजपूत आदीनी केली सदर कार्यवाहीने परिसरात खळबळ उडाली आहे.
       तालुक्यात कोरोना आजाराने कहर केला असल्याने व रोज रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून चार दिवशीय जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला आहे.परंतु काही दुकानदार स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नागरिकांचा जीव धोक्यात घालतांना दिसून येत आहेत अशाच  दुकानांवर तालुका प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून कार्यवाही करण्यात येत आहे.