कोळवदला तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

यावल : तालुक्यातील कोळवद येथील 32 वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवार, 6 रोजी दुपारी दोन वाजता उघडकीस आली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. घनश्याम रामसिंग पाटील (32, रा.कोळवद, ता.यावल) असे मयत तरुणाचे नाव आहे. हातमजुरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणार्‍या घनश्याम यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट होवू शकले नाही. बुधवारी दुपारी दोन वाजता राहत्या घरात कुणीही नसतांना लोखंडी रॉडला दोरी बांधून त्यांनी गळफास घेतला. या प्रकरणी यावल पोलिसात राजू नामदेव पाटील (34, कोळवद) यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अस्लम खान करीत आहेत. यावल ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम तिडके यांनी केले.

Copy