Private Advt

कोळन्हावीतील तरुणाला जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण

फैजपूर : यावल तालुक्यातील कोळन्हावी येथील तरूणाला मागील भांडणाच्या कारणावरून बेदम मारहाण करून दुचाकी जाळल्याचा प्रकार अकलूद येथे घडला. या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
किशोर राजेंद्र सोनवणे (28, रा.कोळन्हावी) हे कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शुक्रवार, 28 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता ते यावल तालुक्यातील अकलुद येथील हॉटेल जलसा येथे दुचाकी (एम.एच.19 बी.एफ.3189) ने आला होता. त्यावेळी दोन वर्षांपुर्वी झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून विशाल सुनील कोळी (रा. कठोरा, ता.यावल), प्रदीप उर्फ गोलू दिलीप कोळी (रा.रायपूर, ता.रावेर) यांच्यासह दोन अनोळखी तरूण यांनी किशोर सोनवणे यांच्याजवळ येवून शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली तर एकाने दुचाकी जाळून टाकली. यात दुचाकी जळून खाक झाली. या प्रकरणी किशोर सोनवणे याने शनिवार, 29 जानेवारी रोजी सायंकाळी फैजपूर पोलिसात दिल्यानंतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे करीत आहे.