कोल्ह हिल्स परिसरातील विहिरीत वृद्धाची आत्महत्या !

0

जळगाव : शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील जाणता राजा शाळेकडे जाणार्या रस्तालगत असलेल्या विहिरित याच परिसरातील एक वृध्दाने आत्महत्या केल्याची घटना समोर शनिवारी सकाळी १० वाजता समोर आली आहे . लक्ष्मण धोंडू सोनवणे वय ६२ रा. लक्ष्मीनगर असे मयताचे नाव आहे.

दरम्यान ते मनोरुग्ण असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू अशी माहिती मयत लक्ष्मण सोनवणे यांचा मुलगा सागर सोनवणे याने बोलताना दिली आहे . घटनेची माहिती मिळाल्यावर तालुका पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश चव्हाण , सतीश हाळनोर, उमेश भांडारकर विलास पाटील , विजय दुसाने यांनी घटनास्थळ गाठले होते . येथील नागरिक व तरूणांच्या मदतीने विहिरीबाहेर मृतदेह काढण्याचे काम सुरू होते .

Copy