कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू

0

कोल्हापूर : कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर रेडिडोह येथे तवेरा गाडीचा टायर फुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याच्या डोहात ती कोसळली. या झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू तर २ जण जखमी झाले आहेत.

हा अपघात पहाटे दोन वाजेच्या सुमारास झाला असून डोहात कोसळलेली गाडी बाहेर काढण्यात आली आहे. गणपतीपुळेहून परतत असताना हा अपघात झाला आहे. मृतांमध्ये १ महिला व ४ मुलींचा समावेश आहे. मृत व जखमी सर्व मिरज येथील रहिवाशी आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, अश्विनी सुनील तांदळे (वय २६), अनिषा सुनील तांदळे (१४), श्रावणी सुनील तांदळे (३), धनश्री शशिकांत माने (७), जान्हवी सुनील तांदळे ( वय ७, सर्व रा. दत्त कॉलनी, मालगाव रोड, मिरज) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर आदर्श नितीन तांदळे (वय ५), ओम सुनील तांदळे (वय ३) या बालकांवर कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलराजे रुग्णालयात (सीपीआर) अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त मोटारीतील अन्य काही प्रवासी बेपत्ता आहेत. त्यांची शोध मोहिम सुरु आहे.

Copy