Private Advt

कोल्ड्रींक्समध्ये गुंगीकारक पदार्थ टाकून महिलेवर अत्याचार

पिंपरी : महिलेला शीतपेय पाजल्यानंतर गुंगी येताच तरुणाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना सोमवार, 23 रोजी दुपारी 1 ते 5 या कालावधीत मारूंजी कोलते पाटील, ता.मुळशी येथे घडली. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात संशयीत आरोपी शुभम विनायक बने (19, रत्नागिरी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीला अटक करण्यात आली.

घरी नेत केला अत्याचार
मला तुझाशी काही बोलायचे आहे, असे सांगून संशयीत आरोपीने पीडतेला गाडीवर बसवत मारूंजी कोलते पाटील येथील राहत्या घरी नेले. त्यानंतर कोल्ड्रींक्समध्ये गुंगीकारक पदार्थ मिक्स करून महिलेला बेशुद्ध केले व फिर्यादी यांच्या इच्छेविरूध्द शारीरीक संबंध ठेवले. त्यांनतर फिर्यादी यांना घरातून जाण्यास मज्जाव केला, असे तक्रारीत नमूद आहे.