कोलकाताची बंगळूरूवर मात

0

बंगळूरू । रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूची खराब सुरूवात झाल्याने सहा गड्यांच्या मोबदल्यात 20 षटकात कोलकता नाईट रायडरसमोर 159 धावांचे लक्ष ठेवले. बंगळूरू संघाच्या मनदिप सिंग आणि ट्राव्हीस हेड यांच्या दोघांच्या भागीदारीमुळे केवळ काही चांगल्या धावांपर्यंत मजल मारण्यात आली. या खेळात कर्णधार विराट कोहली मात्र उमेश यादवच्या फेकीमुळे केवळ 9 चेंडूत 5 धावा काढले. तर कोलकाताच्या संघातील ख्रिस लिन आणि सुनिल नरीने या दोघांच्या भागीदारीत अवघ्या सहा षटकात शंभर धांवांचा डोंगर उभारला त्यानंतर दोन्ही खेळाडू एका पाठोपाठ बंगळरूने बाद करत तंबूत पाठविले. त्यानंतर कॉलिन दे ग्रान्डाम आणी गौतम गंभीर अनुक्रमे 31 आणि 14 धावा काढून बंगळूरूला कोलकाताने धुळ चारली.

20 षटकांत 6 गडी गमावत 158 धावांचे लक्ष्य कोलकातासमोर
उमेश यादवच्या पहिल्याच चेंडूवर गेल बाद झाल्यामुळे आरसीबीला मोठा धक्का बसला होता. त्यानंतर कर्णधार विराट कोहली, एबी डिव्हिलर्स थोड्या धावाच्या अंतराने बाद झाल्यामुळे 34/3 अशी बिकट अवस्था आरसीबीची झाली होती. यानंतर सलामीला आलेल्या मनदिपने डाव सावरत संयमी अर्धशतकी खेळी केली. त्याने 1 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 43 चेंडूत 52 धावा उभारल्या. तर त्याच्यासोबत हेडने दुसर्‍याबाजून आक्रमक खेळी करत संघाला चांगली धावसंख्या उभारण्यासाठी योगदान दिले. हेडने फक्त 47 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने 75 धावा केल्या. या तिघांशिवाय कोणालाही 2 अंकी धावसंख्या उभारता आली नाही. आरसीबीने 20 षटकांत 6 गडी गमावत 158 धावांचे लक्ष केकेआरसमोर ठेवले आहे. यांच्या समोर कोलकाताच्या गोलंदाज उमेश यादव याने तीन बळी घेण्यात यश आले. तर सुनिल नरूने आणि ओकर्स यांना अनुक्रमे 2 आणि 1 बळी घेतले.

प्रत्युत्तरात कोलकाताकडून धुव्वा
याचा प्रतिउत्तर म्हणून कोलकाताने आपली खेळी सुरूवातीपासून जोरदार धुव्वाधार खेळ खेळत ख्रिस लिन आणि सुनिल नरीने यांनी सहा षटकात शंभरी पार पडून दोन्ही खेळाडूंनी अनुक्रमे 50 आणि 54 धावा काढून आपले अर्धशतक ठोकून तंबूत परत आहे. या दोघांच्या भागीदारीमुळे कोलकाताच्या संघास मोठ्या प्रमाणावर मदत मिळाली होती. अवघ्या 15.1 षटकात सहा बळी राखत 159 धावा काढून बंगळूरूवर मात केली आहे. आजच्या सामन्याचा हिरो अष्टपैलू नारायणने 17 चेंडूंत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर 54 धावा करत अर्धशतक करत कोलकाताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. तर लीननेही 22 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार लगावत अर्धशतकी खेळी केली आहे.