कोर्ट चौकातून कार लांबवली

0

जळगाव : मध्यप्रदेश येथून जिल्हा न्यायालयात आलेल्या तरूणाची इंडिका कार अज्ञात चोरट्यांनी कोर्ट चौकातून सायंकाळी 4 ते 6 वाजेच्या दरम्यानात चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी तरूणाने अज्ञात चोरट्याविरूध्द शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
मध्यप्रदेश राज्यातील इंदोर येथून आनंद सोनी हा एमपी. 09.सीए. 1147 ने वडीलांसोबत जळगावात आला होता. जिल्हा न्यायालयात काम असल्यामुळे त्याने कार ही कोर्ट चौकातील एचडीएफसी एटीएमजवळ उभी केली होती. त्यानंतर आनंद हा वडीलांसोबत न्यायालयात गेला. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास न्यायालयातील काम आटोपून घरी परतण्यासाठी कार लावलेल्या ठिकाणी आला असता त्याला त्याची कार दिसून आली नाही. यावेळी त्याने परिसरात शोध घेतला असता कार मिळून आली नसल्याने त्याला कार चोरी झाल्याची खात्री झाली. यानंतर आनंद याने सायंकाळी शहर पोलीस स्टेशन गाठत कार चोरी झाल्याची माहित देत अज्ञात चोरट्यांविरूध्द तक्रार दिली.