कोरोना हद्दपार होईपर्यंत भुसावळातील रेल्वेचा पीओएच कारखाना बंद ठेवावा

0

भुसावळ : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे जिल्हा रेड झोनमध्ये पोहोचला असून भुसावळातील दिवसागकि कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच भुसावळातील रेल्वेचा पीओएच कारखाना बंद ठेवावा यासह अन्य मागण्यांबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना रेल्वे कामगार सेनेतर्फे साकडे घालण्यात आले.

शिष्टमंडळाने विविध मागण्यांवर केली चर्चा
सोमवारी पालकमंत्र्यांची रेल्वे कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. लॉकडाऊन सुरू असतानाच रेल्वेच्या पीओएच, एमओएच तसेच ट्रॅकमन डीसीओएस, डीआरएम कार्यालय आदी ठिकाणी रेल्वे कर्मचार्‍यांची ड्यूटी सुरू आहे. दरम्यान, सुरुवातीला जिल्हा ऑरेंजा झोनमध्ये असता पीओएच कारखाना उघडण्याची जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली आता मात्र जिल्हा रेड झोनमध्ये गेला असून पीओएच तसेच एमओएच हे कंटेन्मेंट झोनपासून जवळच आहे शिवाय या ठिकाणी जाणारे कर्मचारी हे एकमात्र असलेल्या रस्त्यावरून जाणार आहेत शिवाय 50 वर्षे वयोगटातील कर्मचार्‍यांना देखील ड्युटीवर बोलावले जात असून या वयोगटातील कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रातील बहुतेक रेल्वेचे कारखाने बंद असल्याने भुसावळची परीस्थिती गंभीर होण्यापूर्वीच पीओएच कारखाना बंद करण्याची मागणी करण्यात आली तसेच रेल्वे दवाखान्याची परीस्थिती व उपाययोजना व काही कमतरता आहेत ते पाहण्यासाठी पालकमंत्र्यांनी यावे, अशी विनंतीही त्यांना करण्यात आली. संबंधित अधिकारी व जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर योग्य तो निर्णय होईल, अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली.

वैद्यकीय साहित्याबाबत तक्रार
बर्‍याच ठिकाणी रेल्वे कामगारांना कोरोना प्रतिबंधक वैद्यकीय सामग्री पुरेशा प्रमाणात देण्यात आलेल्या नाहीत शिवाय सोशल डिस्टन्स पाळले जात नाही तसेच एमओएचमध्ये ड्युटीवर येताना कर्मचार्‍यांना मोठा त्रास होतो शिवाय हे कामगार कोरोना पॉझीटीव्ह भागात राहतात त्यांना देखील तीन शिष्टमध्ये ड्युटीसाठी बोलावले जात असून कारखाना सुरूच झालाच तर कोरोना शहरातून हद्दपार होत नाही तोपर्यंत बंद करण्यासाठी प्रयत्न राहतील, रेल्वे कामगार संघटनेचे मंडळाध्यक्ष ललितकुमार मुथा, मंडळ कार्याध्यक्ष प्रीतम टाक, मंडळ उपाध्यक्ष अरविंद थोरात यांनी कळवले आहे.

Copy