कोरोना संशयीत ६२ वर्षीय महिलेचा मृत्यू

0

जळगाव– पहिल्या कोरोनाग्रस्ताचा १४ दिवसानंतरचा तपासणी अहवाल निगेटिव्ह येत नाही तोच आज सायंकाळी साडेसात वाजता कोरोना संशयित ६२ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कडून देण्यात आली आहे. मयत झालेल्या महिलेला न्यूमोनियाचा त्रास होता. या मयत महिलेचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. या महिलेला काल दिनांक १० रोजी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.