कोरोना संशयित चिमकुल्यांसह दहा जणांचा अहवाल निगेटीव्ह

0

जळगाव- जिल्हा रुग्णालयात दाखल 12 एप्रिल व 13 एप्रिल रोजी घेण्यात आलेल्या कोरोना संशयित रूग्णापैकी 10 व्यक्तींचे तपासणी अहवाल धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाले असून सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
या अहवालामध्ये पुणे येथील रहिवासी पत्ता असलेल्या 1 दिवसाच्या बाळाचा, बर्‍हाणपूर (मध्यप्रदेश) येथील 6 महिन्याच्या बाळाचा, मलकापूर येथील 62 वर्षीय महिलेचा तर रावेर येथील एकाच कुटूंबातील तीन व्यक्तींचा समावेश आहे. उर्वरित संशयित रूग्णांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाही, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

Copy