कोरोना संकटात आदिवासी मजुरांना मनरेगा अंतर्गत हाताला काम

0

नवापूर🙁 हेमंत पाटील)-लाॅकडाऊन शाप वाटत असेल पण नवापूर तालुक्यांतील ग्रामीण भागात मजुरांना गावातच काम दिल्याने काही गावांना तो वरदान असल्यासारखा भासत आहे. मनरेगारामुळे 4.60 कोटी रू गाळ काढण्याच्या कामांना मान्यता देऊन दररोज 6500हुन अधिक लोकांना रोजगार उपल्बध होत आहे.6605 मजुरांना दररोज काम मिळत आहे.

लोकांना पावसाळ्यातील बियाणे खरेदी,शेत कामासाठी प्रति कुटुंब 25000 रूपये मिळवून देणे आणि जलसंधारणाचे मोठे काम करणे हेच एकमेव उद्दीष्ट असुन लोकांचा खुपच सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
-लाॅकडाऊन कालावधीत 3000 पेक्षा जास्त अकुशल मजूर काम सोडून गावाकडे परतले.

तालुक्यांतील सर्व ११४ ग्रामपंचायतीमध्ये कामे तयार आहेत फक्त मजुरांनी मागणी केली पाहीजे
—आज रोजी १७ कोटीच्या रोजगार कामांना प्रशासकीय मान्यता देऊन तयार आहेत.यामध्ये गाळ काढणे ,घरकुलांवरील मजूरी,शोषखड्डे,शौचालये,विहीरी,सीसीटी,नाडेप,वनीकरण,रोपवाटीका,फळबाग लागवड इत्यादी कामांचा समावेश
-मोठ्या स्वरूपात रोजगार देण्यासाठी ४४ गाळ काढण्याच्या कामाला तात्काळ मान्यता दिली आहे.४.६० कोटी रू
नवागाव,चिंचपाडा,खानापूर,खेकडा,निमदर्डा,मोठे कडवान,वर्हाडीपाडा,डाळीआंबा,चेडापाडा या गावात मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्याची कामे सुरू आहेत.याशिवाय अनखी ४१ग्रामपंचायतींच्या गाळ काढण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता.दिली आहे.
-एकूण ७७ ग्रामपंचायतीमध्ये आज रोजी कामे सुरू आहेत.उर्वरित जागी लवकरच सुरू होतील.
प्रति दिन २३८ रूपये मजूरी आठ दिवसाच्या आत थेट मजूरांच्या बॅंक खात्यात जमा

तालुक्यात आलेल्या सर्व मजूरींना त्याच्या गावातच रोजगार देण्याचा १००% प्रयत्न होत आहे.ज्याला हवा त्यांनी तात्काळ रोजगार मागणी करावी.८००० पेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दीष्ट आहे.आज ६६०५ लोक कामावर आहेत यांत उद्या अाणखी वाढ होईल. कोणामुळे लग्न झाल्यावर गावाकडे परतलेल्या मजुरांना उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेल्या नंदुरबार जिल्ह्यातील 30 हजार आदिवासी मजुरांना मनरेगा अंतर्गत रोजगार उपलब्ध झाला आहे अशी माहीती बीडीओ नंदकुमार वाळेकर यांनी दिली असुन नवापूर तालुक्यात चांगले काम सुरु आहे. नावली येथील मध्यम सिंचन प्रकल्पातून गाळ काढण्याचे काम मजुरांना उपलब्ध करून दिले आहे दोन महिने हे काम सुरू राहील अशी माहिती देण्यात आली आहे.
सहा तालुक्यांमध्ये 238 रुपये रोजंदारी ने काम सुरू आहे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यात योजना सुरू आहे 30000 स्थलांतरित व गावातील मजुरांना काम मिळाले आहे प्रत्येक मजुराला दिवसाला 238 रुपये मजुरी दिली जाते आठ दिवसात ही रक्कम त्याच्या खात्यात जमा केली जात आहे.
करुणा मुळे मजुरांना काम करताना फिजिकल डिस्टिंक्शन सह इतर नियमाचे पालन करणे बंधनकारक केले आहे तोंडाला माणूस म्हणून प्रत्येक कुटुंबाला काम करण्यासाठी जागेची आखणी करून दिले आहे ते उपलब्ध करून दिले आहे याची विशेष दक्षता बीडीओ नंदकुमार वाळेकर यांनी घेतली आहे.