कोरोना व्हायरसच्या मुद्द्यावर चीनविरोधात खटला

0

कोलंबिया : अमेरिकेतील मिसौरी राज्याने कोरोना व्हायरसच्या मुद्यावरून चीनी सरकारविरोधात खटला दाखल केला आहे. यात चीनमधील अधिकार्‍यांना दोषी ठरवण्यात आले असून महामारीच्या सुरुवातीला बिजिंगने जगाला चुकीची माहिती दिल्याचे म्हटले आहे.

हा खटला, मिसौरीचे महाधिवक्ता (अटर्नी जनरल) यांनी अमेरिकेच्या फेडरल कोर्टात दाखल केला आहे. यात, चीनमधील अधिकारी मिसौरीसह संपूर्ण जगात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंना आणि आर्थिक नुकसानाला जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रिपब्लिकन अटर्नी जनरल एरिक शमिट यांनी एका लेखी निवेदनात म्हटले आहे, की ’चीनी सरकारने कोविड-१९चा धोका आणि संसर्गाच्या बाबतीत जगाला खोटी माहिती दिली आणि कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाही. यासाठी चीनला उत्तरदाई ठरवायला हवे.

Copy