कोरोना : विशेष पार्सल गाड्यांमध्ये वाढ

3

भुसावळ : कोरोनाच्या दुष्पप्रभावामुळे आवश्यक साधन सामुग्री वहन करण्यासाठी विशेष पार्सल गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सामुग्री पाठवण्यासाठी जवळ-पासच्या स्टेशन मधे मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

पोरबंदर-शालिमार विशेष पार्सल गाडी
गाडी क्रमांक 00913 डाउन पोरबंदर-शालिमार विशेष पार्सल गाडी ही 7, 10, 13, 16, 19, 22, 25 व 28 जून रोजी पोरबंदर स्टेशनहुन सकाळी आठ वाजता सुटेल व तिसर्‍या दिवशी रात्री 01.30 वाजता शालिमार स्टेशनवर पोहोचेल.

शालिमार-पोरबंदर विशेष पार्सल गाडी
गाडी क्रमांक अप 00914 शालिमार-पोरबंदर विशेष पार्सल गाडी ही 6, 10, 14, 18, 22, 26, 30 जून रोजी शालिमार रेल्वे स्थानकावरून 22.50 वाजता सुटल्यानंतर तिसर्‍या दिवशी 6.25 ला पोरबंदर रेल्वे स्थानकावर पोहोचेल.

Copy