कोरोना विरुद्धचा युद्ध जिद्दीने जिंकू; मुख्यमंत्र्यांचा जनतेला विश्वास

0

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज महाराष्ट्राच्या जनतेशी १० मिनिटे संवाद साधला. कोरोनाबाबत घ्यावयाची काळजीबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. हे एक युद्ध असून या युद्धाशी लढण्यासाठी सर्वांनी एकजुटीने सहकार्य करावे. या परदेशी विषाणू रुपी युद्धाशी आपण लढा देतो आहोत आणि तो जिंकू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोललेलो आहे, केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी सर्व सहकार्य करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले.

कोरोनाशी लढा देणारी यंत्रणा ही सीमेवर लढणाऱ्या जवानांसारखीच असून त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहण्याची आपली जबाबदारी आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हा परदेशी संकट असून तो फार काळ टिकणार नाही. सरकार जे जे सूचना करता आहेत, त्याचे पालन करा, दुसरे काहीही करू नका असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

यात्रा, उत्सव, धार्मिक कार्यक्रमे रद्द झाले ही समाधानाची बाब आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Copy