कोरोना वाढल्याची बदनामी : साकळीतील सहा जणांविरुद्ध गुन्हा

0

यावल : तालुक्यातील साकळी येथे कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे सांगून समाज मनात गैरसमज पसरविणार्‍या सहा जणांविरूद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी नुर मोहम्मद शेख कमालउद्दीन (21) यांच्या फिर्यादीनुसार भुषण मधुकर कोळी (20), सागर अशोक पाटील (20), विशाल बोरसे (22), गोल्या भोई (22), अक्षय शिरसाळे आणि मनोहर उर्फ भैय्या परदेशी (लोधी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर व पोलस कर्मचारी उल्हास नथ्थु राणे करीत आहेत.

Copy