कोरोना लस: भारतासाठी आजचा दिवस मोठा आणि महत्त्वाचा

0

पुणे: जगभर कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे लस. मात्र लस विकसित करून ती बाजारात आणण्यात अद्याप कोणत्याही देशाला यश आलेले नाही. दरम्यान भारतात कोरोनावरील सात लसींची चाचणी सुरु झाली आहे. यामध्ये सीरम इन्स्टिट्यूट ब्रिटेनचे ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझिनेका कंपनीच्या लसीमुळे आघाडीवर आहे. भारतासाठी कोरोना लसीबाबत आजचा दिवस महत्त्वाचा आणि मोठा आहे. आज 25 ऑगस्टला देशात कोरोना व्हायरसवरील लसीच्या दुसऱ्या चाचणी टप्प्याला सुरुवात होणार आहे. हे व्हॅक्सिन ब्रिटेनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. मात्र, या लसीचे उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये केले जात आहे. आज कोरोना लसीची दुसरी चाचणी सुरु केली जाणार आहे.

कोणत्याही लसीचा दुसरा टप्पा खूप महत्वाचा असतो. कारण फेज-2 ट्रायलसोबत मोठ्या प्रमाणावर लसीच्या ट्रायल ३ टप्प्याचा रस्ता साफ होतो. भारतात तयार केल्या जाणाऱ्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या या लसीचे नाव कोविशिल्ड (Covishield) ठेवण्यात आले आहे. पुण्याच्या भारती विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या चाचणी टप्प्याची सुरुवात होणार आहे. याी टप्प्यात सुदृढ व्हॉलिंटिअरना Covishield लस टोचली जाणार आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या या लसीच्या उत्पादनासाठी सीरम इंस्टिट्यूट अॅस्ट्राझिनेका कंपनीसोबत करार केला आहे. सीरमला भारताच्या सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गेनाइजेशन (CDSCO) कडूनही परवानगी मिळाली आहे.