कोरोना रुग्णाचा रिपोर्ट व्हायरल, संबंधितांवर गुन्हा दाखल होणार

0

जळगाव – शहरातील एका रुग्णाला कोरोनाचे निदान झाल्याचा वैद्यकीय तपासणी अहवाल व्हायरल केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी पोलिसांना दिले आहेत.

जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णाला कोरोना झाल्याचा अहवाल काल सायंकाळी सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. असे कृत्य करण्यास मनाई आहे. याची गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.