कोरोना रिकव्हरीत महाराष्ट्र अव्वल

0

मुंबई: जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोणाचा देशासह महाराष्ट्र झपाट्याने प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्ण वाढीचे प्रमाण अधिक असले तरी दुसरीकडे रिकव्हरी रेट देखील चांगला आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या ४७ लाखांच्या पुढे जावून ४७ लाख ५४ हजार ३५७ वर पोहोचली आहे. त्यातील ३७ लाख २ हजार ५९६ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये देशभरात ७८ हजार ३९९ जणांनी करोनावर मात केली आहे. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ७७.८८ टक्क्यांवर आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत असले तरी करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही महाराष्ट्र अव्वलस्थानी आहे. एका दिवसात राज्यात १३ हजार जणांनी करोनावर मात केल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्राच्या खालोखाल करोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. करोनामुक्त झालेल्या एकूण संख्येतील ५८ टक्के रुग्ण देखील याच पाच राज्यांमधील आहेत.

Copy