कोरोना योद्धा परीचारिकांचे नंदुरबारला काम बंद आंदोलन

0

नंदुरबार। कोरोना योद्धा म्हणून ओळख असलेल्या जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी नंदुरबार ला कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. जिल्हा रुग्णालयातील अधिपरीचारिकांची सेवा नियमित करावी, या मागणीसाठी दि,8 जून रोजी एक दिवशीय आत्मक्लेश आंदोलन करण्यात येत आहे, यावेळी आरोग्य मंत्रालयीन भोंगळ कारभाराचा देखील निषेध करण्यात आला. वारंवार पाठपुरावा करून देखील परीचारिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने पुकारलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून जिल्हा रुग्णालयातील परीचारिकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

Copy