कोरोना युद्धात यापुढे शिवसैनिक कोविड योद्धा म्हणून काम करेल

0

मुक्ताईनगर : शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी 12 ते 2 असा राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांसोबत एकाच वेळी व्हिडीओ कॉन्फरंन्सींगद्वारे संवाद साधला. या चर्चेत राज्याचे चीफ सेक्रेटरी अजोय मेहता व शिवसेना सचिव अनिल देसाई व शिवसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांनीदेखील चर्चेत सहभाग घेतला. यापुढे कोरोना युद्धात आता शिवसैनिकांनी कोविड योद्धा म्हणून काम करावे, अशी सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी मांडली आणि जवळपासचे खाजगी क्लिनिक व हॉस्पिटल उघडण्याची संबंधीत डॉक्टरांना विनंती करा त्यांना आपण पीपीई किट, सॅनीटाईझर व मास्क आदी संरक्षक साहित्य उपलब्ध करून देऊ, अशी सर्वात मोठी घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग चर्चेत केली.

जिल्हा सिव्हील सर्जन यांचीही व्हावी बदली
प्रसंगी चर्चेत सहभागी होत शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, जळगावमध्ये कोरोना हा ग्रीन झोनमध्ये जात असताना अधिकार्‍यांमध्ये समन्वय नसल्याने आज जळगावची स्थिती 500 बाधीत रुग्णापर्यंत पोहोचली आहे. त्यातच बाधितांचा 50 वर मृत्यू आकडा गेलेला आहे. मृत्यूचा आकडा हा चिंताजनक असून अधिकार्‍यातील असमन्वयामुळे जिल्हा सामान्य वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता खैरे यांची बदली केली गेली मात्र आता जिल्हा सिव्हिल सर्जन यांचीही उचलबांगडी होणे गरजेचे आहे. पालकमंत्री महोदय , जिल्हाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपाययोजना करण्यासाठी वेळोवेळी नियोजन करीत आहे मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांत बेबनाव असल्याने कोरोना संक्रमितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्याकरिता कारवाई अपेक्षित आहे तसेच शेतकर्‍यांच्या बाबतीत विचार व्हावा, सीसीआयद्वारा कापूस खरेदी केंद्रावर केवळ 20 शेतकर्‍यांचा कापूस मोजला जात असल्याने हजारो शेतकर्‍यांच्या घरात कापूस पडून आहे. या ठिकाणी जास्तीत-जास्त शेतकर्‍यांचा कापूस मोजला जाव, अशा मुख्य सूचना मांडत आमदार पाटील यांनी पक्ष प्रमुखांच्या आदेशानूसार शिवसैनिक व पदाधिकारी बुथवाईज मतदार यादी चेक करून 55 वर्षावरील नागरीकांचे स्क्रिनिंग तपाणणी करतील व सक्षम कोविड योद्धा म्हणून शिवसैनिक प्रभावीपणे काम करेलखअसे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारा पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी याप्रमाणे संवाद साधला.

Copy