कोरोना : यावलमध्ये मास्क न लावणार्‍या 12 जणांविरुद्ध गुन्हे

0

यावल :  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने नागरीकांना घराबाहेर पडताना तोंडाला मास्क वा रूमाल बांधणे अनिवार्य केल्यानंतरही काही नागरीक जाणून-बुजून आदेश पाळत नसल्याने अशा 12 नागरीकांविरुद्ध शुक्रवारी यावल पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या नागरीकांकडील पाच वाहने यावल पोलिसांनी जप्त केली असून कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे यावल पोलिसांकडून सांगण्यात आले.