कोरोना बाधीत महिलेच्या संपर्कातील सात जणांचे अहवाल नेगेटीव्ह

0

जळगाव- अमळनेर तालुक्यात आढळून आलेल्या कोरोना बाधित 60 वर्षीय महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींपैकी 7 व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले असून सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये या महिलेच्या पतीच्या अहवालाचाही समावेश आहे. उर्वरित व्यक्तींचे तपासणी अहवाल अप्राप्त आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.