‘कोरोना’ ने मृत पत्रकाराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्या

भुसावळ शहर पत्रकार संस्थेचे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना साकडे

भुसावळ : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून यात काही पत्रकारांनाही बाधा होऊन त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नेहमी जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविणार्‍या पत्रकारांचे परीवार मात्र उघड्यावर आले आहेत त्यामुळे कोरोनामुळे मृत पावलेल्या पत्रकारांच्या परीरवारास आर्थिक मदत देण्यात यावी तसेच पत्रकारांना बाधा झाल्यास मोफत उपचार करावेत, अशी मागणी भुसावळ शहर पत्रकार संस्थातर्फे शुक्रवारी भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना निवेदन देवून करण्यात आली. निवेदनाच्या प्रत जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी रामसिंग सुलाणे, तहसीलदार दीपक ढिवरे, पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनाही देण्यात आली.

भुसावळातील कोरोना योद्ध्यांचे निधन
कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जगात हाहा:कार उडाला असून अनेक जण आजारी आहेत तर अनेकांचा मृत्यु ओढवला आहे. ‘पत्रकार’ हे समाजाच्या हिताचे काम करीत असतांना त्यांना प्रत्यक्ष फिल्डवर काम करावे लागते त्यामुळे कितीही काळजी घेतली तरी कोठेना-कोठे त्यांना ‘कोरोना’ शी सामना करावा लागत आहे. मात्र तरीही न डगमगता ते आपल्या कर्तव्याशी इमान राखून जनसेवेचे हे कार्य दिवसरात्र करीत आहेत. अलिकडच्या काळात जळगाव जिल्ह्यातील बरेच पत्रकार ‘कोरोना’ मुळे दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यात भुसावळच्या पत्रकारांच्या देखील समावेश आहे. भुसावळ येथील पत्रकार परशुराम बोंडे, विजय घोरपडे आदी पत्रकारांच्या समावेश आहे. ‘कोरोना’ मुळे पत्रकारांच्या झालेल्या मृत्यु व त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेला दु:खाचा डोंगर पाहता त्यांच्यावर अक्षरश: उपासमारीची वेळ आलेली आहे. घरातील कमावती व्यक्ती आपले कर्तव्य पार पाडत असतांना अचानकपणे निघून गेल्यामुळे त्यांचे कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट कोसळलेले आहे. अशा परीस्थितीत महाराष्ट्र शासनातर्फे अशा मृत पत्रकारांच्या कुटुंबीयांना, वारसांना 50 लाखाची आर्थिक मदत मिळणेची मागणी केली आहे.

मागण्यांबाबत पाठपुरावा करणार : आमदार
यावेळी आमदार सावकारे यांनी पत्रकारांच्या विविधांगी समस्या समजून घेत त्या शासन दरबारी मांडणार असल्याची ग्वाही उपस्थिताना दिली.

निवेदन देताना यांची उपस्थिती
आमदार संजय सावकारे यांना निवेदन देताना शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रेम परदेशी, उपाध्यक्ष गणेश वाघ व उपाध्यक्ष आशिष पाटील, सचिव हबीब चव्हाण, विकास चव्हाण सतीश कांबळे आदींची सोशल डिटस्न्स राखून उपस्थिती होती.

निवेदन देताना यांची होती उपस्थिती
प्रांताधिकारी यांना निवेदन देताना शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रेम परदेशी, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत जोशी, संजयसिंग चव्हाण, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड.नितीन खरे, खजिनदार उज्वला बागुल, संतोष शेलोडे, सचिव हबीब चव्हाण, निलेश फिरके, गोपी म्याँद्रे, कमलेश चौधरी, सतीश कांबळे, इम्तियाज शेख, कलीम पायलट, कालू शाह, राहूल वानखेडे, विनोद गोर्धे, सुनील आराक आदी पत्रकार उपस्थित होते. दरम्यान, निवेदनावर उपाध्यक्ष गणेश वाघ, आशिष पाटील, सहसचिव राजेश तायडे , ज्येष्ठ पत्रकार हेमंत जोशी, श्रीकांत सराफ, शाम गोविंदा, वासेफ पटेल, उदय जोशी, चेतन चौधरी, प्रफुल्ल नेवे, प्रशांत नेवे, इक्बाल खान, राजेश पोतदार, राजू चौधरी, विवेक ओक, कैलास उपाध्याय, अभिजीत आढाव ,सद्दाम खाटीक, अनिल सोनवणे, संजय काशिव, किशोर शिंपी ,सलाउद्दीन आदिब, दीपक चांदवानी, प्रकाश तायडे, शकील पटेल, प्रशांत अग्रवाल, विकास चव्हाण, वसीम शेख, आकाश ढाके आदी पत्रकारांच्या स्वाक्षरी आहेत.

Copy