कोरोनाशी लढण्यासाठी मोदी सरकारचा ‘प्लॅन’तयार

0

नवी दिल्ली – देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने मोदी सरकारने कोरोना महामारीशी लढण्यासाठी तीन टप्प्यातील रणनीती आखत आहे. केंद्राने राज्यांसाठी विशेष पॅकेज जारी केले असून इमरजेन्सी रिस्पॉन्स अँन्ड हेल्थ सिस्टिम प्रिपेअरनेस पॅकेज असे नाव दिले आहे. या पॅकेजसाठी पूर्णत: १०० टक्के निधी केंद्र सरकार देणार आहे.

पहिला टप्पा जानेवारी २०२० ते जून २०२०, दुसरा टप्पा जुलै २०२० ते मार्च २०२१, तिसरा टप्पा एप्रिल २०२१ ते २०२४ अशाप्रकारे तीन टप्पे असणार आहे. पहिल्या टप्प्यात कोरोना बाधितांच्या उपचारासाठी हॉस्पिटल विकसित करणे, आयसोलेशन ब्लॉक बनवणे, व्हेंटिलेटर सुविधा असणारे आयसीयू बनवणे, पीपीई(पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स) एन ९५ मास्क, व्हेंटिलेटर या सुविधा उपलब्ध करणे. तसेच तपासणी केंद्र वाढवणे, त्याचसोबत निधीचा वापर महामारीविरोधात जागरुकता निर्माण करण्यासाठी केला जाईल. निधीचा एक हिस्सा रुग्णालय, सरकारी कार्यालये, जनसुविधा, रुग्णवाहिका यांना संक्रमित होण्यापासून वाचवणे यासाठी खर्च केला जाईल. केंद्र सरकारचा हा प्लॅन केंद्र आणि राज्य यांच्यातील बैठकीनंतर समोर आला आहे.

Copy