कोरोनाला किरकोळ विषाणू म्हणणाऱ्या ब्राझीलच्या अध्यक्षांना कोरोनाची लागण !

0

ब्रासीलिया: कोरोनाने आता जगभरात थैमान घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोनाबाबत निष्काळजीपणा करणाऱ्या ब्राझीलचे अध्यक्ष याइर बोल्सोनारो यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ब्राझीलमध्ये करोनाची साथ हाताळताना अत्यंत निष्काळजीपणाचे धोरण ठेवले असून लॉकडाऊनला विरोध केला होता.

ब्राझील हा लॅटिन अमेरिकेतील मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. मी अगदी ठणठणीत असून हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या गोळ्या घेत आहे असे बोल्सोनारो यांनी सांगितले आहे. ते ६५ वर्षांचे असून त्यांनी आतापर्यंत कुठल्याही शिफारशींचे पालन केले नाही. मुखपट्टी न वापरता ते गर्दीत मिसळत होते, हस्तांदोलनही करीत होते. लक्षणे दिसल्यानंतर मात्र त्यांनी सामाजिक अंतराचा निकष सोमवारपासून पाळून मुखपट्टी परिधान करण्यास सुरुवात केली.

Copy