कोरोनाने जिल्ह्यात चार महिन्यांचा रेकॉर्ड मोडला

0

जळगाव – कोरोनाने जिल्ह्यासह जळगाव शहरात बाधीत रुग्णसंख्येचा चार महिन्यांचा विक्रम मोडीत काढला असून सोमवारी जिल्ह्यात नव्याने 520 तर जळगाव शहरात 154 नवीन कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 14 हजार 863 झाली आहे. सोमवारी दिवसभरात 5 क ोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे दिवसभरात 432 बाधीत रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत.

जिल्हयात दिवसेंदिवस कोरोना प्रादुर्भाव वाढतच असून परिस्थिती अत्यंत चिंताजनक होत आहे. सोमवारी जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट झाला असून नव्याने 520 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 154, जळगाव ग्रामीण 39, भुसावळ 17, अमळनेर 34, चोपडा 13, पाचोरा 11, भडगाव 16, धरणगाव 6, यावल 13, एरंडोल 40, जामनेर 71, रावेर 7, पारोळा 11, चाळीसगाव 55, मुक्ताईनगर 25, बोदवड 3 इतर जिल्ह्यातील 5 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 5 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात चाळीसगाव तालुक्यातील 2 तर जळगाव शहर, जळगाव तालुका, आणि एरंडोल तालुक्यातील प्रत्येकी एका बाधीत रुग्णांचा समावेश आहे. अशी माहिती अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

Copy