कोरोनाने आत्तापर्यंतचे सर्व रेकोर्ड मोडले ; २४ तासात सर्वाधिक रुग्णांची नोंद

0

नवी दिल्ली: कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. भारतात कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत दररोज मोठी वाढ होत आहे. हे देशासमोरील मोठे संकट आहे. प्रादुर्भाव अधिकच वाढत चालल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान आत्तापर्यंतच्या कोरोनाबाधितांच्या संख्येने सर्व विक्रम मोडून काढले आहे. गेल्या २४ तासात करोनाच्या ४५ हजार ७२० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. २४ तासांत देशात एक हजार १२९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रिकव्हरी रेट अधिक असला तरी वाढती संख्या चिंताजनक आहे. महाराष्ट्रातील आकडेवारी देखील चिंता करायला लावणारी आहे. गेय २४ तासात महाराष्ट्रात १० हजार ५७६ नवीन रुग्ण आढळले आहे.

देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १२ लाखांच्या पुढे गेली आहे. देशात एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १२ लाख ३८ हजार ६३५ इतकी झाली आहे. आतापर्यंत सात लाख ८२ हजार ६०६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर चार लाख २६ हजार १६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ६३ टक्क्यांवर पोहोचले आहे. १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही जास्त आहे. दिल्लीमध्ये करोनामुक्त होण्याचे प्रमाण सर्वाधिक ८४.८३ टक्के आहे.

Copy