कोरोनाच्या लढ्यात एनआरएमयुने केली एक कोटी दोन लाखांची मदत

0

भुसावळ : देशात सुरू असलेल्या कोरोना आजाराशी लढा व लॉकडाऊन मुळे उपासमारीची वेळ आलेल्या नागरीकांच्या मदतीसाठी मध्य व कोकण रेल्वेतील रेल्वे कामगारांच्या सर्वात मोठ्या एनआरएमयु अर्थात नॅशनल रेल्वे मजदुर संघटनेतर्फे पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी 51 लाख रुपये प्रमाणे एकूण एक कोटी दोन लाख रुपये मदतीचे धनादेश देण्यात आले.

एनआरएमयुचा नेहमीच पुढाकार
देशावर असो की कामगारांवर आलेल्या कुठल्याही संकटात नेहमी एनआरएमयु संघटनेचा पुढाकार असतो त्यामुळे मध्य व कोकण रेल्वेचे महामंत्री वेणु पी.नायर यांनी युनियन सदस्यता शुल्कातून गोळा झालेल्या रकमेतुन हा निधी दिला. नॅशनल रेल्वे मजदुर युनियन या संघटनेने पूर्वी गुजरात भूकंप 50 लाख, केरळ पुरग्रस्तांसाठी एक कोटी, सांगली सातारा पुरग्रस्तांना एक कोटी रुपयांचा निधी दिल्याचेही महामंत्री वेणू पी.नायर यांनी सांगितले. यूनियनचे कार्यक्षेत्र मुंबई ते खंडवा, मुंबई ते बडनेरा,मुंबई ते मडगांव कोकण पर्यंत असल्याची माहिती भुसावळ विभागीय सचिव आर.आर.निकम यांनी दिली.

Copy