कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे आयुक्त मांडणार पुरवणी अर्थसंकल्प

0

पुणे:- देशासह राज्यात कोरोना विषाणूने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. राज्यात मुंबई, पुणे, नाशिक या बड्या शहरासह छोट्या गावात सुद्धा कोरोनाने शिरकाव केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक समस्येला तोंड देण्यासाठी पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुरवणी अर्थसंकल्प मांडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसरकारच्या कार्यपद्धती नुसार अर्थसंकल्प मांडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राज्यसरकारने दिलेल्या सूचनांनुसार अनावश्यक, सुशोभीकरण तसेच पुढील वर्षी होऊ शकणारी कामे टाळून जे प्रकल्प होऊ शकणार नाही, ते वगळण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोना विषाणूमुळे पुणे मनपाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. पालिकेला सरकरकडून मिळणाऱ्या जीएसटीच्या निधीमध्येही मोठी कपात झाली आहे. मनपाचा आर्थिक गाडा रुळावर आणण्यासाठी धोरणात्मक निर्णय अपेक्षित असून, त्याचाच एक भाग म्हणून आयुक्त पुरवणी अर्थसंकल्प सादर करणार आहे.

Copy