कोरोनाच्या आकडेवारीवरून जितेंद्र आव्हाडांचा संताप

0

मुंबई:- राज्यात दिवसागणिक कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत   मोठी वाढ होत आहे. राज्यातील कोरणा बाधित रुग्णांची संख्या एक लाख झाल्याचे बातमी प्रसारित झाल्याने राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड संतापले आहे. राज्यातून आतापर्यंत 50 हजार रुग्ण बरे झाले, हे सांगितले जात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरकारविरोधात हा मोठा कट असल्याचा

आरोप जितेंद्र आव्हाड केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी अर्धवट दाखवल्या जाणाऱ्या बातम्यांवर संताप व्यक्त केला आहे. राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला पासून आतापर्यंतचा एक लाखाचा आकडा आवर्जून सांगितला जात आहे. परंतु त्यातील पन्नास हजार रुग्ण बरे होऊन घरी केले हे सांगायचे मुद्दाम टाळले जात आहे. तसेच गुजरातमधील कोरोनाविषाणू मुळे किती लोकांचा बळी गेला हे सांगा असे आव्हान दिले आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख, 5 हजार, 958 झाली आहे. त्यातील 50 हजार 978 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता केवळ 53 हजार 17 रुग्णांवर उपचार सुरू आहे. राज्यातील मृतांचा आकडा 3 हजार 950 आहे.

Copy