नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 2 रुग्ण

0

नंदुरबार: जिल्ह्यात 9 कोरोना बाधित बरे झाले असतांनाच कोरोनाचे नवीन 2 रुग्ण आढळून आले आहेत. त्यात नवापूर तालुक्यातील विरवाडीजवळ हळदानी उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या मोचाहोंडा गावातील 48 वर्षीय पुरुष आणि शहादा येथील रझा मस्जिद परिसरातील 42 वर्षांच्या पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या दोघांना यापूर्वीच आयसोलेशनमध्ये ठेऊन उपचार सुरू करण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने ही माहिती दिली आहे.

1 जून रोजी 9 जण कोरोनामुक्त झाले होते. रात्रीतून पुन्हा नवीन दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 36 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यातील 3 जणांचा मृत्यू झाला असून 28 जण कोरोनातुन मुक्त होऊन बरे झाले आहेत. सद्यस्थितीत
5 जण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Copy