कोरोनाचा फटका: १०, १२ वी आयसीएसई परीक्षा स्थगित

0

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाने कहर केला आहे. दररोज रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. शासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून नियोजित सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालयांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. परीक्षाही स्थगित करण्यात आल्या आहेत. आता पूर्वनियोजित आयसीएसईची परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. Council for the Indian School Certificate Examinations ने पत्रक जाहीर करून याची माहिती दिली आहे.

१९ ते ३१ मार्चपर्यंत आयसीएसईची परीक्षा होणार होती, मात्र कोरोनामुळे आता ती स्थगित करण्यात आली आहे.

Copy